Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले २००२ चे विराट रूप दाखवून द्यावे असे शब्द कंगनानं ट्विट वापरले होते.

कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड
SHARES

हिंसक आणि भडकाऊ पोस्टमुळे भाजप समर्थक अभिनेत्री कंगना रनौटचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर तिनं एक ट्विट केलं होतं. सोबतच, एक व्हिडिओ देखील जारी केला होता.

व्हिडिओमध्ये तिनं पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी समर्थकांकडून हिंसाचार वाढल्याचं म्हटलं होतं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले २००२ चे विराट रूप दाखवून द्यावे असे शब्द वापरले होते. त्यानंतर तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं.


कंगनानं पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर ट्विट केलं होतं की, "हे अतिशय भयंकर आहे. गुंडगिरीला मारण्यासाठी आपल्याला महागुंडगिरी आणायला हवी. ती एक राक्षसी आहे. तिला नियंत्रणात आणण्यासाठी मोदीजींना आपल्या २००० च्या दशकातील विराट रूप दाखवावे लागेल." यासोबत तिनं पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारा एक हॅशटॅग सुद्धा वापरला.

कंगनानं यासोबत एक व्हिडिओ सुद्धा जारी केला होता. त्यामध्ये ती रडून हिंदूंवर अत्याचाराचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा केला होता. कुठलंही माध्यम हे दाखवत नाही. असं मुद्दाम केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारनं यावर काही करायला हवं. सरकार देशद्रोह्यांना घाबरतं की काय असंही तिनं व्हिडिओमध्ये रडता-रडता म्हटलं होतं.हेही वाचा

...तर नवी दयाबेव शोधू, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' निर्मात्याचा खुलासा

हर्षवर्धन राणे बुलेट विकून गरजूंसाठी ऑक्सिजन कंसन्ट्रेटर करणार खरेदी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा