Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांच्या मदतीस धावला सलमान खान

बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांच्या मदतीसाठी सलमान खाननं (Salman Khan) धाव घेतली आहे.

बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांच्या मदतीस धावला सलमान खान
SHARES

बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांना (Bollywood Daily wages Workers) कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. आता या कामगारांच्या मदतीसाठी सलमान खाननं (Salman Khan) धाव घेतली आहे. यावर्षी सुद्धा सलमाननं मनोरंजन सृष्टीतील २५ हजार रोजंदार कामगारांना आर्थिक मदत करण्याचा विडा उचलला आहे.

‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लोइज’(FWICI) चे महासचिव अशोक दुबे यांनी नुकताच इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ सलमान खान यांच्या मॅनेजरनं FWICI चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्याशी याबाबतीत संवाद साधला आहे. आणि आमच्याकडून २५ हजार रोजंदार कामगारांच्या बँक डीटेल्स मागवल्या आहेत. सलमान या प्रत्येकांच्या खात्यावर १५०० रुपये पाठवणार आहे.

गेल्यावर्षी सुद्धा त्यांनी अशी मदत केली आहे. गेल्यावर्षी इतर उद्योगांप्रमाणे बॉलिवूडला सुद्धा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. काही महीन्यांपासून सर्व सुरळीत होत होतं. मात्र दुसऱ्या लाटेनं पुन्हा सर्व हिरावून घ्यायला सुरुवात केली आहे.हेही वाचा

सुशांतच्या आयुष्यावर आधारित धडा शालेय पुस्तकात सामिल

अभिनेता अक्षय वाघमारेच्या घरी चिमुकल्याचे आगमन, अरुण गवळी झाले आजोबा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा