Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

अभिनेता अक्षय वाघमारेच्या घरी चिमुकल्याचे आगमन, अरुण गवळी झाले आजोबा

बाळाचा जन्म मुंबईतील दादर इथल्या नर्सिंग होममध्ये झाला आहे.

अभिनेता अक्षय वाघमारेच्या घरी चिमुकल्याचे आगमन, अरुण गवळी झाले आजोबा
SHARES

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाला आहे.

शुक्रवारी दुपारी त्यांनी ही गोड बातमी दिली. बाळाचा जन्म मुंबईतील दादर इथल्या नर्सिंग होममध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.

बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. याबाबत बोलताना तो म्हणाला, 'मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकता नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरू करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघंही सुखरूप आहेत'.

यापुढे बोलताना तो म्हणाला की, 'आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीनं हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्यानं सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. इतकंच नव्हे तर बाळाचं नाव काय ठेवणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

  


हेही वाचा

सुशांतच्या आयुष्यावर आधारित धडा शालेय पुस्तकात सामिल

'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर गोंधळ, शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा