Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

सुशांतच्या आयुष्यावर आधारित धडा शालेय पुस्तकात सामिल

सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख हिनं एका बंगाली शालेय पुस्तकाचा फोटो पोस्ट करुन ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.

सुशांतच्या आयुष्यावर आधारित धडा शालेय पुस्तकात सामिल
SHARES

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता होता. सोबतच रुपेरी पडद्यावर सोज्वळ भूमिका साकारणारा सुशांत वैयक्तिक आयुष्यातही तितकाच शांत आणि हुशार होता. त्याचे हेच गुण विद्यार्थांना कळावे म्हणून सुशांतच्या आयुष्यावरील एक धडा शालेय पुस्तकात सामिल करण्यात आला आहे.

सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख हिनं एका बंगाली शालेय पुस्तकाचा फोटो पोस्ट करुन ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. या पोस्टद्वारे तिनं बंगाली शिक्षण मंडळाचे आभार मानले आहेत. तसंच सुशांतच्या चाहत्यांनी या धड्यासाठी शिक्षण मंडळाचे आभार देखील मानले आहेत.

“सुशांतकडून विद्यार्थांना खूप काही शिकता येईल. तो केवळ उत्तम अभिनेताच नव्हता तर आपल्या आई-वडिलांचा आदर करणारा एक आदर्श मुलगा देखील होता. अभिनयासाठी त्यानं शिक्षण सोडलं नाही किंबहूना शिक्षण देखील तितकच महत्वाच असतं याचं भान त्याला होतं. त्याचे हे सर्व गुण विद्यार्थांना शिकता येतील” असा विश्वास स्मिता पारिखनं या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांत बॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली होती. त्यानं ‘काय पो छे’, ‘पी.के.’, ‘एम.एस. धोनी – अनटोल्ड स्टोरी’, ‘छिछोरे’, ‘दिल बेचारा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याला बॉलिवूडचा राईजिंग स्टार असं म्हटलं जात होतं.

परंतु १४ जून २०२० रोजी संशयास्पद पद्धतीनं त्याचा मृत्यू झाला. पोलीस, सीबीआय आणि एनसीबी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी झाली. परंतु त्याच्या आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचा हात असल्याचा संशय व्यक्त केला गेला.

  


हेही वाचा

लकी अली म्हणतो, काळजी नको मी बरा आहे

'राधे'च्या कमाईतील एक भाग कोरोनाविरूद्ध लढ्यास समर्पित, सलमान खानचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा