Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

लकी अली म्हणतो, काळजी नको मी बरा आहे

लकी अलीनं सोशल मीडियावर प्रकृती ठिक असल्याचा खुलासा केला.

लकी अली म्हणतो, काळजी नको मी बरा आहे
SHARES

प्रसिद्ध गायक लकी अली यांचं निधन झाल्याच्या अफवा मंगळवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर सुरु होत्या. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. अखेर लकी अली यांनी सोशल मीडियावर प्रकृती ठिक असल्याचा खुलासा केला.

लकी अली यांनी इन्स्टावर म्हटलं की, माझ्याबद्दलच्या अफवा ऐकल्या. पण ठिक आहे आणि माझ्या घरी सुखरूप आहे.

तसंच लकी अली यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री नफीसा अली यांनी देखील एक पोस्ट शेअर करत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. लकी अली ठीक असून आपल्या कुटुंबासह बंगळुरुच्या फार्म हाऊसवर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

लकी अली यांची मैत्रीण आणि अभिनेत्री नफीसा अली यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, ‘लकी अगदी ठीक आहे आणि आज दुपारीच आमचं बोलणं झालं. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याला कोरोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती ठिक आहे’ असं म्हटलं आहे.

नफीसा अली यांनी एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘मी दिवसातून २ ते ३ वेळा लकीशी बोलले. तो ठीक आहे. त्याला कोरोना झालेला नाही. तो त्याच्या म्युझिक कॉन्सर्टच्या प्लानिंगमध्ये व्यग्र आहे. आम्ही व्हर्चुअल कॉन्सर्टबद्दल देखील बोललो होतो. तो बंगळुरुमध्ये फार्महाऊसवर आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत. तो आणि त्याचे कुटुंबीय अगदी बरे आहेत.हेही वाचा

'राधे'च्या कमाईतील एक भाग कोरोनाविरूद्ध लढ्यास समर्पित, सलमान खानचा निर्णय

'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर गोंधळ, शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा