Advertisement

बच्चा कंपनी स्माईल! आता चुलबुल पांडे अॅनिमेटेड अवतारात

लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेल्या बच्चे कंपनीसाठी ही आनंदाची खबर आहे.

बच्चा कंपनी स्माईल! आता चुलबुल पांडे अॅनिमेटेड अवतारात
SHARES

बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान (Salman Khan) यांचा चुलबुल पांडे (Chulbul Pandey) अवतार आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. हा चुलबुल आता बच्चा कंपनीच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता चुलबुल पांडे हे लोकप्रिय कॅरेक्टर अॅनिमेटेड व्हर्जन (animated avatar) मध्ये छोट्या पडद्यावर येत आहे.

३१ मे पासून रोज दुपारी १२ वाजता कार्टून नेटवर्कवर प्रसारित झाला आहे. लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेल्या बच्चे कंपनीसाठी ही आनंदाची खबर आहे.

सलमान खान (Salman Khan)नं रविवारी ट्विटरवर (Twitter) एक प्रोमो शेअर केला आहे. त्यात सलमान म्हणतो, ’भईयाजी, स्माईल, आ गये है चुलबुल पांडे अपने अॅनिमेटेड अवतार में’. अन्य एका ट्विट मध्ये सलमाननं कॅप्शन लिहिलं आहे, ‘ बच्चोंसे याद आया, स्वागत नहीं करोगे हमारा? चुलबुल पांडे लँड हो राहा हैं, डिस्नी प्लस व्हीआयपी पर. वहीं अॅक्शन, वहीं मस्ती, नये अवतार में.’

वर्क फ्रंटवर बोलायचे तर सलमानचा राधे (Radhe) नुकताच प्रदर्शित झाला. त्याचे टायगर ३ (Tiger 3), किक २ (kick 2) आणि कभी ईद कभी दिवाली हे आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.

दरम्यान सलमान खान (Salman Khan)च्या फिल्म रिव्ह्युवर केआरके(KRK)नं युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे सलमान खानच्या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केलं. तथापि, सलमान खाननं हे चांगल्यात घेतलेलं नाही. त्यामुळे आता केआरकेही अडचणीत सापडला आहे.

रिपोर्ट्सनुसार, सलमान खाननं मानहानीची नोटीस (Notice) पाठविली आहे. केआरकेनं ट्विटरवर याची माहिती दिली. "प्रिय सलमान खान तुम्ही पाठवलेली नोटीस म्हणजे तुम्ही निराश असल्याचा पुरावा आहे. मी माझ्या अनुयायांचा आढावा घेत आहे आणि माझं काम करत आहे. मला थांबवण्याऐवजी तुम्ही चांगले चित्रपट बनवावेत," असं मत देखील व्यक्त केलं.

यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट शेअर केलं, ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, "मी बर्‍याच वेळा असं म्हटलं आहे की मी कोणत्याही निर्माते, अभिनेत्याच्या चित्रपटाचा आढावा घेण्यास कधीही विचारत नाही. तर मी कधीही समीक्षा घेत नाही. राधेचा आढावा घेण्यासाठी सलमान खाननं माझ्यावर मानहानीचा खटला दाखल केला म्हणजे तोदेखील खूपच कमी पडत आहे. माझ्या पुनरावलोकनावर जास्त परिणाम झाला. म्हणून मी आता त्याच्या चित्रपटांचे पुनरावलोकन करणार नाही. माझा शेवटचा व्हिडिओ आज रिलीज होत आहे."     हेही वाचा

बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांच्या मदतीस धावला सलमान खान

राधेचा रिव्ह्यू केल्यामुळे KRK विरोधात सलमान खानची नोटीस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा