Advertisement

दादरमधल्या ८ मजली इमारतीला आग

मुंबईतील दादरमध्ये एका ग्राउंड-प्लस-आठ मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली.

दादरमधल्या ८ मजली इमारतीला आग
SHARES

सोमवारी रात्री मुंबईतील दादरमध्ये एका ग्राउंड-प्लस-आठ मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली. दादर पश्चिमेतील डॉ डिसिल्व्हा रोडवरील यश प्लाझा इमारतीत रात्री ९ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

"आग पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यापर्यंत पसरली होती.  त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिस आणि वीज पुरवठादार बेस्टचे कर्मचारी घटनास्थळी हजर होते. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. सध्या तिथे कुलिंगची प्रक्रिया सुरू आहे." अधिकारी म्हणाले. म्हणाला.

(सविस्तर वृत्त लवकरच)


हेही वाचा

विद्यार्थ्यांची झोप महत्त्वाची! राज्य सरकार 'या' निर्णयाच्या विचारात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा