Advertisement

सीएसएमटी स्थानकात सुरू होणार 'रेस्टाॅरंट ऑन व्हिल'

मध्य रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स (सीएसएमटी) स्थानकात 'रेस्टाॅरंट ऑन व्हिल' सुरू केलं आहे.

सीएसएमटी स्थानकात सुरू होणार 'रेस्टाॅरंट ऑन व्हिल'
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असते. अशातच आता मध्य रेल्वे प्रशासनानं प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स (सीएसएमटी) स्थानकात 'रेस्टाॅरंट ऑन व्हील' सुरू केलं आहे. रेल्वे स्थानकातील प्रवाशांसह अनेकजण 'रेस्टाॅरंट ऑन व्हिल' या फिरत्या रेस्टाॅरंटमधून खाद्य खरेदी शकणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'रेस्टाॅरंट ऑन व्हिल'साठी संबंधित अधिकाऱ्यांनी निविदा दिल्या असून, हा प्रकल्प २०२२ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. या रेस्टाॅरंटचं बांधकाम या वर्षाच्या अखेरीस पुर्ण होण्याची शक्यता असून, सीएसएमटी स्थानकाच्या 'पी.डी. मेलो' प्रवेशद्वाराजवळ सुरू करण्यात येणार आहे.

'रेस्टाॅरंट ऑन व्हिल' हा प्रकल्प सुरू झाल्यास मध्य रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास इतर स्थानकातही अशाप्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य रेल्वे या प्रकल्पासाठी कोच, ट्रॅक आणि इतर आवश्यक गरजेच्या वस्तू पुरवणार आहे. प्रस्तावित कोच सीएसएमटीच्या हेरिटेज गल्लीजवळ ठेवण्यात येणार आहे, ज्यात रेल्वेच्या इतर अनेक विभागांचाही समावेश आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा