Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ

मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळूनही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीत अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ
SHARES

मुंबईत पावसाने दमदार सुरुवात तर केली. पण पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. शहरात क्वचितच हलक्या सरी अनुभवायला मिळत आहेत. याचच परिणाम की, मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीत अध्याप कुठलीच वाढ नोंदवली गेली नाही. 

सांताक्रूझ (Santacruz) आणि कुलाबा (Colaba) वेधशाळेच्या अहवालानुसार, गुरुवार 20 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात अनुक्रमे 166 मिमी आणि 294 मिमी पाऊस पडला, जूनच्या सरासरी 493 मिमीपेक्षा हे प्रमाण फारच कमी आहे.

भातसा (Bhatsa) आणि वैतरणा (Vaitarna) या दोन तलावांमधील पाणीसाठ्याने अशरक्ष: तळ गाठला आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आरक्षित साठ्यातून पाणी काढत आहे. तसेच सरोवरातील पाण्याची पातळी गेल्या 10 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.

मुंबईला तब्बल सात तलावांमार्फत पाणी पुरवठा होतो. या सात तलावांपैकी पाच तलाव ठाणे(Thane), पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहेत. तसेच इतर दोन शहराच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) तुळशी (Tulsi) आणि विहार (Vihar) तलाव आहेत. मध्यम पाऊस पडला असला तरी लहान तलावांमध्ये शहराच्या एकूण पाणीसाठ्याच्या 2 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे.  

यावर एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले, की जमिनीत आणि तलावांमध्ये पाणी मुरण्यासाठी तब्बल एका आठवड्याचा मुसळधार पाऊस लागतो. सध्या, बीएमसी शहरातील 2.28 लाख दशलक्ष लिटरच्या राखीव साठ्यातून 53,000 दशलक्ष लिटर पाणी वापरते.

इतर पाच तलावांमध्ये 77,082 दशलक्ष लिटर पाणी आहे जे जुलै अखेरपर्यंत पुरेल.


तलावनिहाय पावसाची नोंद :

  • अप्पर वैतरणा - 82 मिमी
  • मोडक सागर - 121 मिमी
  • तानसा - 167 मिमी
  • मध्य वैतरणा - 131 मिमी
  • भातसा - 159 मिमी
  • विहार - 212 मिमी
  • तुळशी - 221 मिमी



हेही वाचा 

ठाणेकरांनो लक्ष द्या! 21-22 जूनला पाणीकपात

नवी मुंबईकरांसाठी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा