Advertisement

उड्डाणपुलांवरील खड्ड्यांची दुरुस्ती


उड्डाणपुलांवरील खड्ड्यांची दुरुस्ती
SHARES

माटुंगा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पडलेले खडे्डे बुजवण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. 'मुंबई लाईव्ह'ने यासंबंधीचे वृत्त 'उड्डाणपूल गेले खड्ड्यात' शीर्षकाखाली 23 सप्टेंबर रोजी प्रसारित केले होते. त्यानंतर मनसेच्या रस्ते आस्थापनाने महानगरपालिकेचे मुख्य अभियंते एस.पी. कोरी यांना घेराव घालून निवेदन दिले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता पूल, परळ टीटी उड्डाणपूल, सायन रुग्णालय उड्डाणपूल, नानालाल डी मेहता उड्डाणपूल आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मनसे रस्ते अस्थापन सरचिटणीस मिलिंद पांचाळ यांनी शिष्टमंडळासह महानगर पालिका मुख्य अभियंता एस.पी. कोरी यांना घेराव घातला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा