
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, कल्याण आणि वांगणी स्थानकांदरम्यान पादचारी पुलावरील (FOB) 'एन' प्रकारचा ट्रस हटविण्याचे काम करण्यात येणार आहे.
दिनांक: 27/28 जून 2026 (शनिवार-रविवार मध्यरात्र)
वेळ: रात्री 1.20 ते पहाटे 3.50 वाजेपर्यंत
मार्ग: कल्याण ते वांगणी दरम्यान अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्ग
ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत दरम्यान कोणतीही उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.
सीएसएमटी–बदलापूर लोकल (रात्री 11.51)
सीएसएमटी–अंबरनाथ लोकल (रात्री 12.02)
बदलापूर–ठाणे लोकल (रात्री 11.04)
अंबरनाथ–सीएसएमटी लोकल (पहाटे 3.43)
सीएसएमटी–कर्जत लोकल (रात्री 12.12) ठाणे येथेच संपविण्यात येईल.
करजात–सीएसएमटी लोकल (पहाटे 2.30) कर्जतऐवजी ठाण्याहून पहाटे 4 वाजता सुटेल.
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल
सीएसएमटी–कर्जत : रात्री 11.30
बदलापूर–सीएसएमटी : रात्री 11.29
ब्लॉकनंतरची पहिली लोकल
ठाणे–कर्जत : पहाटे 5.00
कर्जत–सीएसएमटी : पहाटे 3.35
अंबरनाथ–सीएसएमटी : पहाटे 4.08
खालील गाड्या कर्जत–पनवेल–दिवा मार्गे वळविण्यात येणार असून त्या 10 ते 20 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कोणार्क एक्स्प्रेस (भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई)
विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
होस्पेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
कल्याण येथे नियोजित थांबा असलेल्या या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, तिसरा-चौथा मार्ग प्रकल्प आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा ब्लॉक अत्यावश्यक असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करावे.
हेही वाचा
