Advertisement

सीएसएमटी स्थानकात बफरला धडकलेल्या लोकलच्या मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

मागील काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात बफरला धडक दिलेल्या मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

सीएसएमटी स्थानकात बफरला धडकलेल्या लोकलच्या मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
SHARES

मागील काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात बफरला धडक दिलेल्या मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. पंकज गुलाबचंद इंदोरा असं या मोटरमनचे नाव होतं. पंकज हे मूळचे जयपूरचे रहिवाशी असून ते मुंबईतील गुरु तेग बहादूर नगर परिसरात असलेल्या रेल्वे वसाहतीत रहात होते.


मोटरमनचा मृत्यू

२६ एप्रिल २०१९ रोजी हार्बर मार्गावरील बेलापूर स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलेली लोकल फलाट क्रमांक १ ला धडकली होती. लोकलचा वेग कमी होता त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेनंतर पंकज गुलाबचंद इंदोरा यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ७ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. या घटनेला आठवडा उलटण्याआधी मोटरमन इंदोरा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.


बफरला धडक लोकल 

हार्बर रेल्वे मार्गावरील बेलापूरहून निघालेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ११.३० वाजता फलाट क्रमांक १ वर येताना बफरला धडकली. या धडकेमुळं मोटरमनच्या मागे असणाऱ्या महिला डब्यातील प्रवाशांना जोराचा धक्का बसला. काही प्रवासी डब्यात पडले. त्यानंतर लोकल थांबताच अनेक प्रवासी तातडीनं लोकलमधून उतरले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धडकलेली लोकल मागे घेतली. या सर्व प्रकारामुळं हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती.



हेही वाचा -

अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या बंगल्याला नोटीस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा