Advertisement

मुंबईचा पाणी प्रश्न मिटला, वर्षभर मिळणार विनाकपात पाणी

मान्सूनमध्ये झालेल्या धुवांधार पावसामुळे मुंबईकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईचा पाणी प्रश्न मिटला, वर्षभर मिळणार विनाकपात पाणी
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये  मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये मुंबईला पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. या तलावांमध्ये २५ सप्टेंबरला १४ लाख २८ हजार ४१८ दशलक्ष लिटर म्हणजे तब्बल ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना पुढील वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. 

तलाव भरणं आवश्यक

मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा, विहार, तुळशी आणि मोडक सागर हे तलाव जुलैमध्येच भरले होते. मात्र तरीही मुंबईच्या दृष्टीनं भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा हे ३ मोठे तलाव भरणं आवश्यक आहे. सध्यस्थितीत भातसा तलावात ९८.८१ टक्के, मध्य वैतरणा तलावात ९८.४५ टक्के, तर अप्पर वैतरणा तलावात ९८.३० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पाणीसाठा शिल्लक

मुंबईला मोडकसागरअप्पर वैतरणातानसाभातसामध्य वैतरणाविहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज ३ हजार ९५८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, आता पावसाळा संपल्यानंतर पुढील वर्षभरासाठी सर्व तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक असणं आवश्यक असून, जवळपास तितकाच पाणीसाठा जमा झाल्यानं महापालिकेला मुंबईला विनाकपात पाणीपुरवठा करण शक्य होणार आहे.

तलावातील पाणीसाठा

तलाव
पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरण 
,२३,१९०
मोडक सागर
,२७,००१
तानसा
,४३,४१६
मध्य वैतरणा
,९०,५३५
भातसा
,०८,५३२
विहार
२७,६९८
तुळशी
,०४६
एकूण
१४,२८,४१८




हेही वाचा -

मुंबईत गुरूवारी गडगडाटासह पावसाचा इशारा

ब्रिटानिया अॅण्ड कंपनी रेस्टॉरंटचे मालक बोमन कोहिनूर यांचं निधन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा