Advertisement

मुंबईत गुरूवारी गडगडाटासह पावसाचा इशारा

मुंबईमध्ये मंगळवारी रात्री विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली

मुंबईत गुरूवारी गडगडाटासह पावसाचा इशारा
SHARES

मुंबईमध्ये मंगळवारी रात्री विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. तसंच, बुधवारी सकाळीही जोरदार पाऊस पडत होता. मात्र, गुरूवारी देखील मुंबईत गडगडाटासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याशिवाय, गुरूवारनंतर शुक्रवार ते रविवारपर्यंत मुंबईत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातील मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. त्यानंतर काही विश्रांती घेतलेल्या पावसानं मंगळवारी रात्री विजांच्या गडगडाटासह हजेरी लावली असून, हा पाऊस बुधवारी सकाळच्या सुमारासही कायम होता. बुधवारी सकाळी .३० पर्यंत कुलाबा इथं ६७.२ तर सांताक्रूझ इथं ३०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची नोंद

कुलाब्यासह, विद्याविहार, घाटकोपर, वरळी इथं ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. तसंच, नवी मुंबईमध्येही जोरदार सरींनी उपस्थिती लावली. त्या मानानं पश्चिम उपनगरामध्ये जोरदार सर आल्याचं समजतं. बुधवारी दिवसभर उपनगरांमध्ये तुरळक पाऊस होता. सांताक्रूझ इथं १.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर कुलाबा इथं सकाळी ८.३० ते संध्याकाळी .३० वाजेपर्यंत १६.६ मिलिमीटर पाऊस पडला.

गडगडाटासह पावसाचा इशारा

गुरुवार आणि शुक्रवार पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाण्यामध्ये गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण विभाग वगळता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये रविवारपर्यंत गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, कोकण विभागात शुक्रवारपासून रविवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे


हेही वाचा -

कुठल्याही बँका बंद होणार नाहीत, RBI कडून अफवांवर खुलासा

ईडीचा पाहुणचार स्वीकारणार- शरद पवार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा