Advertisement

कुठल्याही बँका बंद होणार नाहीत, RBI कडून अफवांवर खुलासा

सोशल मीडियावरील मेसेज अफवा असून कुठल्याही व्यापारी बँका बंद होणार नाहीत, असा खुलासा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने केला आहे.

कुठल्याही बँका बंद होणार नाहीत, RBI कडून अफवांवर खुलासा
SHARES

पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅप बँकेवर (पीएमसी) आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये गोंधळाचं वातावरण असतानाच, सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कायमस्वरूपी बंद होत आहेत, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या अफवा असून कुठल्याही व्यापारी बँका बंद होणार नाहीत, असा खुलासा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने केला आहे.  

तसंच यासंदर्भात अर्थ सचिव राजीव कुमार यांनी सांगितलं की, 'सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारकडून आर्थिक पाठबळ देऊन त्यांना ग्राहकांना चांगली सेवा देण्याकरीता सशक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काही बँका बंद होतील, हा सोशल मीडियावर पसरलेला मेसेज चुकीचा आहे.

आरबीआय सार्वजनिक क्षेत्रातील ९ बँका कायमस्वरुपी बंद करत असल्याने या बँकांच्या खात्यांमधून तुमचे पैसे आताच काढा असं आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये युको बँक, आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांसह ९ बँकांचा उल्लेख करण्यात आला आहे.  



हेही वाचा-

'ह्या' कारणामुळे पीएमसीवर आले निर्बंध

आरबीआयचा नवा नियम, तुमच्या खात्यात रोज जमा होणार १०० रुपये



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा