आरबीआयचा नवा नियम, तुमच्या खात्यात रोज जमा होणार १०० रुपये

बँकांकडे तक्रार केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी आरबीआयकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

SHARE

बऱ्याचदा ऑनलाईन व्यवहार करताना तुमच्या खात्यातून पैसे डेबिट होतात. मात्र, तो व्यवहार अयशस्वी झालेला असतो. त्यानंतर ते पैसे परत मिळण्यासाठी बँकेच्या अनेक फेऱ्याही माराव्या लागतात. पैसे तर लगेच खात्यात जमा होत नाहीत. मात्र, आपलेच पैसे मिळवण्यासाठी त्रासही सोसावा लागतो. पण आता बँकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवा नियम केला आहे. 

अयशस्वी झालेल्या ऑनलाईन व्यवहाराचे पैसे परत मिळेपर्यंत दर दिवशी १०० रुपये बँकेकडून ग्राहकाला मिळणार आहेत.  आरबीआयने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकानुसार, जेवढे दिवस बँक पैसे द्यायला उशीर करेल तेवढे दिवस रोज १०० रुपये ग्राहकाला मिळतील. या नियमामुळे बँक ग्राहकांना आता पैशांसाठी जास्त दिवस वाट पहावी लागणार नाही.  बँकांकडे तक्रार केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी आरबीआयकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. 

UPI, IMPS, NACH द्वारे अर्थात मोबाइल वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू असणार आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममधील अयशस्वी व्यवहारांच्या केलेल्या तक्रारीचं निवारण पाच दिवसांमध्ये करणं बंधनकारक आहे. जर निवारण न झाल्यास ग्राहकाच्या खात्यात दररोज १०० रुपये दंड बँकांना द्यावा लागेल.  या नियमानुसार लाभ न मिळाल्यास ग्राहक आरबीआयकडे तक्रार करू शकतात.हेही वाचा -

धक्कादायक! PMC बँकेवर आर्थिक निर्बंध, खातेधारकांना एवढीच रक्कम काढता येणार

खूशखबर...बँकांचा संप टळला!
संबंधित विषय
ताज्या बातम्या