Advertisement

खूशखबर...बँकांचा संप टळला!


खूशखबर...बँकांचा संप टळला!
SHARES

विविध राष्ट्रियीकृत बॅंकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रियीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी २६ आणि २७ सप्टेंबरला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. संघटनांचा २ दिवस संप आणि आठवडा सुट्टी यामुळं जवळपास ७ दिवस बॅंका बद राहणार होत्या. परंतु, संघटनांच्या समस्येबाबत अर्थसचिवांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानं हा संप स्थगित करण्यात आला आहे. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक संघटनांनी प्रसिद्ध केलं आहे.

संपाचा निर्णय

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफेडरेशनऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनइंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेसनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिस या ४ संघटनांनी संपाचा निर्णय घेतला होतासंघटनांच्या संपामुळं ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागणार होतं. केंद्रातील मोदी सरकारनं देशातील १० सरकारी बॅंकांचं ४ बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं हजारो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी ऑफिसर्स ट्रेड यूनियननं  संपाची हाक दिली होती


सकारात्मक चर्चा 

दरम्यान, या ४ संघटनांच्या नेत्यांसोबत अर्थसचिवांनी बैठक घेतली. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर चारही संघटनांनी संयुक्तीक प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये संप मागे घेतल्याची घोषणा केली. संघटनांच्या या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


संघटनांच्या मागण्या


  • बँकांचे विलिनीकरण करू नये.
  • पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा.
  • रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी.
  • वेतन आणि पगारात बदल करावे.
  • ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी.
  • आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावे.
  • एनपीएस रद्द करावा.
  • बँकांमध्ये नोकरभरती करावी.



हेही वाचा -

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरावस्था, विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय

मुंबईतील 'या' रुग्णालयातील व्हेंटिलेटर बंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा