Advertisement

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निधनाची बातमी खोटी; वाचा नेमकं कारण काय?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्या प्रकृती आता व्यवस्थित असल्याची माहिती स्वत: किशोरी पेडणेकर यांनी दिली.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निधनाची बातमी खोटी; वाचा नेमकं कारण काय?
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्या प्रकृती आता व्यवस्थित असल्याची माहिती स्वत: किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापौर पेडणेकरांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना तातडीनं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान एका वृत्त वाहिनीकडून त्यांच्या निधनाची बातमी दिली गेली. त्यानंतर महापौरांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावरही गेलं. पण ही अफवा असल्याचं थोड्याच वेळात लक्षात आलं. काही प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमांवर मुंबईच्या माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रकृतीबाबत अनुचित वृत्त प्रसारित करण्यात येत आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर उपचार करणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलनेही एक प्रेस नोट काढून, त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती दिली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर ग्लोबल रुग्णालयामध्ये योग्य ते उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रकृती अस्‍वस्‍थ वाटू लागल्‍यानं महापौर या रुग्‍णालयात दाखल झाल्‍या. सद्यस्थितीत महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर आहे. स्‍वतः मा. महापौरांनी त्‍यांच्‍या वैयक्‍ति‍क आणि महापौर कार्यालय ट्व‍िटर अकाऊंटवरुन संदेश देत अफवांचे खंडन केले आहे. त्‍यामुळे कृपया कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती. “कुठलेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्या वृत्ताची शहानिशा करून ते वृत्त प्रसारित करावे, अशी मी आशा करते”, असेही महापौर कार्यालयातून सांगण्यात आले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक खालावली. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे. परंतु सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आलीय. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत होता.

अखेर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः जातीनं ट्विट करत या अफवांना पूर्णविराम दिलाय. किशोर पेडणेकरांनी ज्या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली, त्या वृत्तवाहिनीला ट्विट करत खडेबोल सुनावलेत. प्रिय… मी जिवंत आहे आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तसेच तुमच्या माहितीसाठी थोड्या वेळापूर्वीच दाल खिचडी खाल्ली आहे. मला खात्री आहे की, एक अग्रगण्य माध्यम गट म्हणून आपण सर्व मूलभूत पत्रकारिता तत्त्वांविषयी जागरूक आहात. कृपया करून अशा बातम्यांची शहानिशा करण्याचे कष्ट घ्यावेत. किमान एवढी तरी अपेक्षा करू शकतो, असं ट्विट करत किशोरी पेडणेकरांनी संबंधित वृत्तवाहिनीची चांगलीच कानउघाडणी केली.

ग्लोबल रुग्णालयानंही यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलंय. माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांना आज दुपारच्या सुमारास छातीत दुखत असल्यानं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या आजाराचं निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू केले.



हेही वाचा -

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा