SHARE

मुंबईतल्या तरुणांसाठी अानंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमअारसीएल) विविध विभागांमध्ये 90 जागांसाठी 'हिवाळी शिकाऊ भरती' (इंटर्नशिप) करण्यात येणार असून या भरतीची अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 


कुठे किती जागा?

'एमएमअारसीएल' पुढील 90 जागांसाठी शिकाऊ भरती करणार अाहे.

  1. वित्त - 5 जागा
  2. एचअार - 5 जागा
  3. शहरी वाहतूक नियोजन/पीअार/जमीन/पर्यावरण - 20 जागा
  4. सिस्टिम (इलेक्ट्रिकल/माहिती तंत्रज्ञान) - 10 जागा
  5. प्रोजेक्ट्स (सिव्हिल इंजिनिअरिंग) - 50 जागा


महिन्याचं मानधन नाही

इंटर्नशिपच्या काळात प्रशिक्षणार्थींना प्रवास/खाणे/राहणे याकरीता कोणत्याही प्रकारचं मानधन अथवा भरपाई दिली जाणार नाही.


अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांना थेट पोस्टाद्वारे किंवा 'एमएमअारसीएल'च्या ट्रेनिंग सेलकडे ई-मेल पाठवून अर्ज करता येईल. 11 डिसेंबरपर्यंत एमएमअारसीएस, बीकेसी अाॅफिस या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा training.hr@mmrcl.com या ई-मेलवर अर्ज पाठवता येईल.


शैक्षणिक पात्रता

विविध विभागातील पोस्टसाठी वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक पात्रता अावश्यक अाहे. मुंबई मेट्रो रेलच्या हिवाळी शिकाऊ भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत सूचना वाचावी. या निकषांमध्ये फिट बसणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी येथे भेट द्यावी: https://www.mmrcl.com/en/careers

संबंधित विषय
ताज्या बातम्या