Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

सेंद्रीय खत प्रकल्प उभारणाऱ्या ६ इमारतींना कर सवलत

ओल्या कचऱ्यापासून (Wet waste) खतनिर्मिती (Fertilizer production) करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना (Housing Society) मालमत्ता करात (Property tax) मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) सवलत देणार आहे.

सेंद्रीय खत प्रकल्प उभारणाऱ्या ६ इमारतींना कर सवलत
SHARES

ओल्या कचऱ्यापासून (Wet waste) खतनिर्मिती (Fertilizer production) करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना (Housing Society) मालमत्ता करात (Property tax) मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) सवलत देणार आहे. वांद्रे (Bandra),खार ( Khar,) सांताक्रुझ ( Santa Cruz) या परिसरातील ६ गृहनिर्माण सोसायट्यांनी इमारतींच्या आवारात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. या इमारतींना मालमत्ता करात ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतींना दरमहा २५ हजार रुपये सवलत मिळणार आहे. 

या ६ इमारतींमधून तयार होणाऱ्या कचऱ्याचीदेखील त्यांच्याच स्तरावर विल्हेवाट लावली जात आहे. वांद्रे पूर्व (Bandra east), खार पूर्व ( Khar east), सांताक्रुझ पूर्व ( Santa Cruz east) येथील कलिना, वाकोला, शासकीय वसाहत, कलानगर, विद्यापीठ परिसर, शिवाजीनगर, खेरवाडी परिसरातील या इमारती आहेत. एमआयजी ग्रुप २, ३ व ४, गोल्डन स्क्वेअर, आर्किटेक्ट टेक्निशियन या पाच सहकारी सोसायट्यांसह कॉम्प्युटर मेंटेनन्स कॉर्पोरेशन मर्यादित या ६ इमारतींमधून दररोज सरासरी १ हजार २०० किलो कचरा तयार होतो. 

कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी सोसायट्यांना त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने सोसायट्यांना केलं आहे. ज्या सोसायट्या-इमारती ओल्या कचऱ्यापासून  (Wet waste) खतनिर्मितीचा (Fertilizer production) प्रकल्प उभारतील व तो नियमितपणे राबवतील, त्यांना मालमत्ता करात कमाल १५ टक्के एवढी सवलत देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतला आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खतात रूपांतर करण्याचे प्रकल्प सहाही इमारतींच्या परिसरात उभारण्यात आले आहेत. सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही इमारतींच्याच स्तरावर केली जात आहे. सहा इमारतींच्या प्रतिनिधींना प्रभाग समितीचे अध्यक्ष शेखर वायंगणकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन नुकतेच एका समारंभात गौरविण्यात आले.हेही वाचा -

पती-पत्नीच्या नावे घराची नोंदणी करणाऱ्यांना करामधून सूट द्या- शितल म्हात्रे

महापालिकेच्या फेरीवाला क्षेत्रांना दादरवासीयांचा विरोध
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा