Advertisement

मुंबईकरांसाठी अलर्ट! पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 20 दिवसांचा पाणी साठा शिल्लक आहे.

मुंबईकरांसाठी अलर्ट! पाणी जपून वापरण्याचे आवाहन
SHARES

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलावांमध्ये ४ जून २०२३पर्यंत फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे. यातून पुढील महिनाभर मुंबईकरांची तहान भागू शकेल.

पण पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे पालिकेकडून तलावक्षेत्रातील पाणी पातळीचा आढावा घेतला जात आहे. पुढील नियोजन म्हणून १० ते १५ टक्के पाणीकपात होऊ शकते, असा अंदाज आहे.

मुंबईला मुबलक प्रमाणात पाणी मिळावं यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी मुंबईसाठी द्यावे अशी विनंती केली होती.

सध्याचा पाणी साठा पाहता पाटबंधारे विभाग/राज्य सरकार यांनी राखीव साठ्यातून पाणीसाठा मुंबईसाठी मंजूर  केला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना जपून पाणी वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसे झाल्यास मुंबईत जूनमध्येच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. 



हेही वाचा

मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा