Advertisement

'माँ'स्क करेल कोरोनापासून आपलं संरक्षण; मुंबई पोलिसांचं नागरिकांना आवाहन

वाढत्या कोरोनामुळं आरोग्य यंत्रणेसोबत पोलिसांवरचा ताणही वाढू लागला आहे.

'माँ'स्क करेल कोरोनापासून आपलं संरक्षण; मुंबई पोलिसांचं नागरिकांना आवाहन
SHARES

मुंबईत कोरोनाचा (coronavirus) विस्फोट झाला असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या वाढत्या कोरोनामुळं आरोग्य यंत्रणेसोबत पोलिसांवरचा ताणही वाढू लागला आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना बंदोबस्तावर राहावं लागत आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही कोरोनाची लागण होण्याची भीती असते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी (mumbai police) मास्क घालण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. इतकंच नाही 'माँ' हा शब्द किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिलं आहे. 

मास्क आपलं कोरोनापासून रक्षण करेल असा संदेश देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यानं कोरोनासह इतर आजाराचांही फैलाव होतो. त्यामुळं जागरूक व्हा, जबाबदार व्हा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर कलम ११७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६० अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात काही दिवसांपासून कोरोना महासाथीची दुसरी लाट आली असून दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य कृती दलाचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कडक निर्बंध लादण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा