सणासुदीच्या काळात मुंबईत लागू होणार कलम 144

  Mumbai
  सणासुदीच्या काळात मुंबईत लागू होणार कलम 144
  मुंबई  -  

  मुंबईत प्रत्येक सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. अशात गैरप्रकार घडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या वतीने सणासुदीच्या काळात कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  मुंबई शहरात न्यायव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलम 144 लावण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपायुक्त (डीसीपी) विरेंद्र मिश्रा यांनी सणासुदीच्या काळात मुंबई शहरातील न्यायव्यवस्था राखून ठेवण्यासाठी कलम 144 लागू केली जाणार असल्याची घोषणा शनिवारी केली.

  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत 6 जूनपासून कलम 144 लागू केली जाणार असल्याची योजना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शांततेत आयोजित होणारे कार्यक्रम आणि उपक्रमांना कोणताही विरोध नसेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.