Advertisement

पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात
SHARES

आषाढी एकादशीसाठी (Ashadhi Ekadashi) पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेल पासून साडेपाच किलोमीटर अंतर पुढे भाविकांना घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Mumbai Pune Expressway)

अपघात इतक्या गंभीर स्वरुपाचा होता की यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले. ही खाजगी बस आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. यामध्ये डोंबिवलीमधील चार गावांमधून चार बस पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्या होत्या. त्यापैकीच एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खाली कलंडली. 

बसच्या या धडकेमध्ये बसमधील प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 42 भाविक किरकोळ जखमी झाले असल्याची माहितीसुद्धा मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 54 भाविक रात्री प्रवास करत होते. पहाटे एकच्या सुमारास ही बस मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून पंढरपूरकडे जात असताना बसच्या पुढे एक ट्रॅक्टर भरधाव वेगात आला. ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरवर आदळल्याने बस 30 ते 40 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ गाठले. त्यांनी तातडीने बचाव कार्य केले आणि जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात आणि पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एक्स्प्रेस वेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही या मार्गावर ट्रॅक्टरला प्रवास करण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



हेही वाचा

सर्व बारमध्ये सीसीटीव्ही आणि AI कॅमेरे लावणे बंधनकारक

वर्क व्हिसासाठी 25 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी जोडप्यावर गुन्हा दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा