Advertisement

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळल्याने वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक जवळपास ठप्प

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळल्याने वाहतूक ठप्प
SHARES

सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅब कोसळल्याचा प्रकार घडला. स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर छतामधून माती आणि पाण्याचा लोंढा रस्त्यावर कोसळत होता. त्यामुळे सध्या मिसिंग लिंकवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

प्रशासनाने नागरिकांना नव्या आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करु नये, असे आवाहन केले आहे. सध्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.

गेल्या चार तासांपासून लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  गेल्या काही तासांमध्ये लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीच्या कितीतरी पट अधिक पाऊस झाला आहे.

दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा