Advertisement

शुक्रवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तास बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांना सावध करणारी ही बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक शुक्रवारी पुन्हा दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तास बंद
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांना सावध करणारी ही बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक शुक्रवारी पुन्हा दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाका दरम्यान ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याच्या कामासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


जुन्या महामार्गाचा वापर

महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSCRT) तर्फे ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याचं काम करण्यात येणार आहे. या कामासाठी पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं या कामामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात येणार आहे. यावेळी अवजड मालवाहू वाहनांना एक्सप्रेस वेवरील चिखले ब्रिज मार्गादरम्यान थांबवण्यात येइैल. त्यामुळं मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दोन तास वाहतूक कोडीचा सामना करावा लागणार आहे.


दोन तास वाहतूक बंद

ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी २ वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल. याआधी देखील १० जानेवारीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील रसायनी ते माडप दरम्यान ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याचं काम करण्यात आलं होतं. त्यावेळीही दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.



हेही वाचा -

पालिकेच्या खुल्या नाट्यगृहांमध्ये पहिल्यांदाच संगीत सभांचे आयोजन

नाताळ-नववर्षासाठीच्या विशेष गाड्यांमुळे मध्य रेल्वेला १ कोटींची कमाई



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा