Advertisement

नाताळ-नववर्षासाठीच्या विशेष गाड्यांमुळे मध्य रेल्वेला १ कोटींची कमाई

नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेतर्फे चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत १ कोटींहून अधिक भर पडली आहे.

नाताळ-नववर्षासाठीच्या विशेष गाड्यांमुळे मध्य रेल्वेला १ कोटींची कमाई
SHARES

नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेतर्फे चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत १ कोटींहून अधिक भर पडली आहे. या काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी ९ विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाताळ ते नववर्षादरम्यान १८ हजार १२६ प्रवाशांनी या विशेष गाड्यांमधून प्रवास केला असून मध्य रेल्वेनं १ कोटी २० लाख ५७ हजार रुपयांची कमाई केली आहे.

नाताळ त्यातही नववर्षाचं सेलिब्रेशन म्हटलं की मुंबईकरांची पसंती असते ती गोव्याला. त्यामुळे दरवर्षी या काळात मुंबईतून मोठ्या संख्येनं पर्यटक गोव्याला धाव घेतात. हीच बाब लक्षात घेत दरवर्षी मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नाताळ ते नववर्षाच्या काळात विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदा १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान मुंबई-करमाळी, मुंबई-मडगाव, पुणे-मंगळुरू अशा नऊ विशेष गाड्या या मार्गावर चालविण्यात आल्या होत्या. यातून मध्य रेल्वेला १ कोटी २० लाख ५७ हजार रूपये मिळाले आहेत.


याआधी २ कोटींची कमाई


रेल्वेकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत, गणेशोत्सव आणि दिवाळीच्या सुट्टीत दरवर्षी विशेष गाड्या सोडल्या जातात. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळतो तर रेल्वेचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आलेल्या १३ विशेष गाड्यांच्या माध्यमातूनही मध्य रेल्वेला मोठा आर्थिक फायदा झाला होता. या १३ विशेष गाड्यांमधून मध्य रेल्वेला २ कोटी २ लाख ५५ हजार रुपयांची कमाई केली होती. तर या गाड्यांमधून २५ हजार २८९ प्रवाशांनी प्रवास केला होता.



हेही वाचा -

शशांक रावांचा मोर्चा आता पालिकेकडे, पालिका कर्मचारी जाणार संपावर?

आता बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास करता येणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा