Advertisement

शशांक रावांचा मोर्चा आता पालिकेकडे, पालिका कर्मचारी जाणार संपावर?

बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी उभारलेल्या लढ्याला यश आल्यानंतर आता कामगार नेते शशांक राव लवकरच आपला मोर्चा मुंबई महानगर पालिकेकडे वळवणार आहेत.

शशांक रावांचा मोर्चा आता पालिकेकडे, पालिका कर्मचारी जाणार संपावर?
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी उभारलेल्या लढ्याला यश आल्यानंतर आता कामगार नेते शशांक राव लवकरच आपला मोर्चा मुंबई महानगर पालिकेकडे वळवणार आहेत. महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा वेतनकरार गेल्या पाच वर्षांपासून रखडला असून आता हा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच यासंबंधी पालिका कर्मचाऱ्यांशी चर्चा करत पुढील निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती शशांक राव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे. त्यामुळे बेस्ट संपानंतर आता लवकरच मुंबईकरांना आणखी एका मोठ्या संपाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.


पालिका कर्मचाऱ्यांचाही वेतनकरार रखडला

बेस्टचा संप हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि यशस्वी झालेला लढा ठरला आहे तर या लढ्याचे नायक ठरले ते शशांक राव. ३० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना एकत्रित बांधत त्यांना त्यांच्या भूमिकेवर ठेवण्याचं मोठ आव्हान पेलत शशांक राव यांनी नऊ दिवसांचा लढा अखेर यशस्वी ठरवला. आता संप मिटला असून कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय दिल्यानंतर आता शशांक राव यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी लढा उभारणार आहेत.


फेब्रुवारीत घेणार मतदान

शशांक राव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून वेतनकरार झालेला नाही. महापालिका कर्मचाऱ्यांनी वेतनकरार व्हावा यासाठी अनेक आंदोलन केली पण तरीही हा प्रश्न तडीस गेलेला नाही. त्यामुळे आता या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधणार असल्याच शशांक राव यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी कामगारांशी चर्चा करत फेब्रुवारीत पालिका कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. आणि या मतदानाच्या निकालानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 



हेही वाचा - 

तब्बल नऊ दिवसांनंतर मुंबईच्या रस्त्यावर धावल्या बेस्ट बस, संप मिटला

बेस्ट कर्मचारी साजरी करणार गोड संक्रांत, लाडू, फटाके आणि जल्लोष



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा