Advertisement

मुसळधार पावसामुळं रेल्वे सेवेला ब्रेक


मुसळधार पावसामुळं रेल्वे सेवेला ब्रेक
SHARES

मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळं मुंबईची तुंबई झाली. त्यातच शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळं मुंबईतील अनेक रस्त्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा वाढणार जोर आणि जलमय रस्ते यामुळं सामन्यांचे हाल होत आहेत.

मुंबईत अनेक ठिकाणी घरं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेलाही पावसाने ब्रेक लावला आहे. पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकीला फटका बसला आहे. 

तिन्ही रेल्वे मार्गांवरील अनेक रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने लोकल सेवा थांबवण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्यावतीनं याची माहिती दिली असून, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा