Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईला येलो अलर्ट

मुंबईत या आडवड्यात कसे असेल वातावरण जाणून घ्या.

मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईला येलो अलर्ट
SHARES

महाराष्ट्रामध्ये आज, गुरुवारपासून (9 सप्टेंबर) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येला तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यासोबतच चक्रीय वात स्थितीही निर्माण झाली आहे. 

दोन्ही प्रणालींच्या प्रभावाखाली उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात गुरुवारपासून (9 सप्टेंबर) चार दिवस मध्यम तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह राज्यातील 7 जिल्ह्यांना Orange Alert देण्यात आला आहे.

पालघर, ठाण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी Anant Chaturdashi Visarjanच्या दिवशी मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा जोर कमी होऊन मध्यम सरींची शक्यता आहे.

पालघरमध्ये काही ठिकाणी शनिवारीही मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण कोकणात रायगडला गुरुवारी आणि शुक्रवारी, तर रत्नागिरीला गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी अति मुसळधार सरींची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि वादळे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असून उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे.



हेही वाचा

चार शहरातील मेट्रो प्रकल्पांना महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मंजुरी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा