Advertisement

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा


Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
SHARES
Advertisement

मुंबईत सोमवारी रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुंबईच्या दादर, परळ, लालबाग, माटुंगा या परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. दक्षिण मुंबईत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. ३ तास हा पाऊस सुरू होता. काही ठिकाणी ९० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती आहे.

मुंबईसह उत्तर कोकणात रात्रीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासर्वाधिक पाऊस वडाळामध्ये झाला. वडाळामध्ये ४६ मिमी पावसाची नोंद झाली. तर दादरमध्ये ३१, रेल्वे कॅम्पमध्ये २८, धारावीत २०, ब्रिटानिया पम्पिंग भागात १८, एसडब्ल्यू वर्कशॉप दादरमध्ये १६, वरळीत १० तर वांद्रेत ९ मिमी पावसाची नोंद झाली.

दक्षिण मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मुंबईसह उत्तर कोकणात रात्री मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement