Advertisement

चेंबूरमध्ये लँडस्लाईड, २५ फूट खोल खड्ड्यात वाहनं कोसळली

मागाठाणे इथे रस्ता खचल्यानंतर मुंबईत ही दुसरी घटना आहे.

चेंबूरमध्ये लँडस्लाईड, २५ फूट खोल खड्ड्यात वाहनं कोसळली
SHARES

बुधवारी (५ जुलै) मुंबईतील चेंबूर परिसरातील एसआरए इमारतीजवळ रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. भला मोठा रस्ता खचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. 40-50 वाहने या मोठ्या खड्ड्यात पडल्याची भीती ट्विटमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तरी एकूण किती वाहने अडकली आहेत याची पुष्टी अद्याप झालेली नाही. सुदैवाने यात कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर चुनाभट्टी भागात वसंतदादा पाटील इंजिनियर कॉलेजसमोरील राहुल नगर भागात असलेल्या एसआरए बिल्डिंग समोर ही घटना झाली आहे. जागा खचल्याने आजूबाजूच्या इमारतींतील नागरिकांनी आपाआपल्या घरातून बाहेरचा रस्ता धरला.

रौनक ग्रुपचे काम सुरु असताना अचानक रस्ता २५ फूट खोलपर्यंत खचला. त्यानंतर त्यात ४० ते ५० मोटरसायकल आणि चार-पाच गाड्या सामावून गेल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

मुंबई, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये पावसाचा जोर वाढत असताना रस्ते खचण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. मागाठाणे (Magathane Metro Station) इथे रस्ता खचल्यानंतर मुंबईत ही दुसरी घटना आहे. 

दिल्लीत, जनकपुरी परिसरात एक रस्ता खचला, रस्त्याच्या मध्यभागी एक मोठे खड्डे तयार झाले. मंगळवार, 4 जून रोजी, लखनौमधील बलरामपूर रुग्णालयाजवळील रस्त्यावर खड्डा पडल्याने वाहन खड्ड्यात जाण्यापासून वाचल्यानंतर एक कॅब चालक थोडक्यात बचावला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा