Advertisement

दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३३१ दिवसांवर

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या प्रादुर्भावात चांगलीच घट होत आहे. गेले अनेक दिवस मुंबईकरांना यामुळं दिलासा मिळत आहे.

दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३३१ दिवसांवर
SHARES

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या प्रादुर्भावात चांगलीच घट होत आहे. गेले अनेक दिवस मुंबईकरांना यामुळं दिलासा मिळत आहे. दरम्यान रविवारी मुंबईत १ हजार ४३१ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी १ हजार ४७० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या २८ हजारांपर्यंत खाली आली आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ३३१ दिवसांवर गेला आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारे आकडे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. नवीन बाधितांची संख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, रुग्ण दुपटीचा कालावधी, सक्रिय रुग्णांची संख्या असे सर्वच आकडे बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहेत. त्याचवेळी मृतांचा आकडा ही मात्र आजही चिंतेची बाब आहे. 

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाने ४९ जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत करोनाच्या विळख्यात सापडलेल्या १४ हजार ६२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. मुंबईतील कोरोनाच्या रविवारच्या इतर आकडेवारीवर नजर मारल्यास गेल्या २४ तासांत १ हजार ४३१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्यापेक्षा किंचित जास्त १४७० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे एकूण ६ लाख ९७ हजार ८१० रुग्ण आढळले आहेत तर ६ लाख ५२ हजार ६८६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. मुंबईत सध्या कोरोनाचे २८ हजार ४१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हा आकडा गेले काही दिवस वेगाने खाली येत आहे. मुंबई पालिका क्षेत्रात रविवारी २३ हजार ३१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत ६० लाख ७२ हजार चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३ टक्क्यांवर पोहचले आहे. १६ मे ते २२ मे पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२० टक्के इतका राहिला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल ३३१ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईतील कोरोना साथ नियंत्रणात येत असताना कंटेनमेंट झोन आणि सील इमारतींचा आकडाही कमी होऊ लागला आहे. सध्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये ५३ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर मुंबईत एकूण २१९ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा