Advertisement

रस्ते अपघातात मुंबई आघाडीवर

दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबई एकूण अपघातांमध्ये 12 व्या आणि मृत्युदरांमध्ये 14 व्या क्रमांकावर आहे.

रस्ते अपघातात मुंबई आघाडीवर
SHARES

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) प्रसिद्ध केलेल्या “भारतातील रस्ते अपघात 2023” या अहवालानुसार, 2023 मध्ये मुंबईत (mumbai) रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी शहरात 2,533 वाहतूक घटना घडल्या होत्या. ज्या 2022 मधील 1,895 घटनांपेक्षा या घटना 33.7 टक्क्यांनी जास्त आहेत.

या अपघातांमध्ये 384 मृत्यू आणि जवळपास 3,000 जखमी झाले होते. शहरातील अपघात (road accidents) प्रामुख्याने अतिवेगामुळे झाले आहेत. यामुळे 2,479 अपघात झाले, ज्यामध्ये 373 मृत्यू आणि 3,242 जखमी झाले.

कारणे

अपघात

मृत्यू

अतिवेग

2,479

373

मद्यपान

54

11

दुचाकी

160

23

पादचारी

1,104

171

सायकल

166

9


दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबई (mumbai traffic) एकूण अपघातांमध्ये 12 व्या आणि मृत्युदरांमध्ये 14 व्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र (maharashtra) एकूण अपघातांमध्ये देशात सहाव्या आणि मृत्युदरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालात असे आढळून आले की बहुतेक अपघात सरळ रस्त्यांवर होतात.

रस्त्यांचा प्रकार

अपघात

मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग

11,742

5,230

राज्य महामार्ग

8,495

3,648

इतर रस्ते

15,006

6,488


2023 मध्ये महाराष्ट्रात 35,243 अपघातांची नोंद झाली. जी 2022 मध्ये झालेल्या 33,383 अपघातांपेक्षा 5.5% जास्त आहे.

राज्यात 15,366 मृत्यूची नोंद झाली. या अपघातांपैकी 57.8% अपघातांमध्ये दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या वाहनांचा समावेश होता. सर्वाधिक 7,244 अपघात दुपारी 3 ते संध्याकाळी 6 दरम्यान झाले.

सीटबेल्ट नियमांचे पालन न केल्याने अनेक मृत्यू झाले. अहवालात असे म्हटले आहे की, राज्यात अशा घटनांमध्ये 725 कारमधील प्रवासी आणि 3,920 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.

2023 मध्ये भारतात 4,80,583 अपघात आणि 1,72,890 मृत्यूची नोंद झाली. एकूण अपघातांपैकी 7.3% आणि मृत्यूंपैकी 8.9% महाराष्ट्रात झाले.



हेही वाचा

नवी मुंबई: विमानतळामुळे मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या

नवी मुंबई ते नांदेड विमानसेवेची मागणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा