Advertisement

मुंबईतल्या 'या' 10 वॉर्ड्समध्ये 29-30 नोव्हेंबरला पाणी कपात

या 24 तासांमध्ये 10 वॉर्ड्समध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

मुंबईतल्या 'या' 10 वॉर्ड्समध्ये 29-30 नोव्हेंबरला पाणी कपात
SHARES

मुंबईत (Mumbai) बीएमसी (BMC) कडून 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 24 तास पाणी कपातीची (Water Cut) घोषणा जारी करण्यात आली आहे. या 24 तासांमध्ये 10 वॉर्ड्समध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

के पूर्व (K East) आणि के पश्चिम (K West) या दोन भागांमध्ये अधिक पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सीप्झ, जोगेश्वरी पूर्व आणि इतर उपनगरातील प्रमुख भागांचा समावेश आहे.

गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर या भागात 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठ्यात कपात होईल. तर आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठ्यात कपात होणार आहे. उर्वरित भागात मात्र पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होईल. असे सांगण्यात आले आहे.

के पश्चिम वॉर्डात राहणार्‍या सुमारे 7.5 लाख लोकांना 24 तासांच्या पाणीकपातीचा फटका बसेल असा अंदाज आहे.

ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू या मेट्रो भागांना 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. तसेच के पश्चिम प्रभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान म्हणाले की, पाणीपुरवठा कपातीच्या काळात कूपर रुग्णालयाला पाणी देण्यासाठी बीएमसीचे टँकर वापरले जातील.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा