Advertisement

पावसामुळे अंधेरी सबवे बंद, 'या' मार्गावर वळवली वाहतूक

आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

पावसामुळे अंधेरी सबवे बंद, 'या' मार्गावर वळवली वाहतूक
SHARES

मुंबई मध्ये अंधेरी सब वे परिसरात पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या Gokhale Road वरून ट्राफिक वळवल्याची माहिती मुंबई ट्राफिक विभागाने दिली आहे. दरम्यान आज सकाळपासून मुंबईमध्ये मुशळधार पाऊस सुरू आहे.

गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे ४१.४ मिमी, तर कुलाबा येथे ३३.२ मिमी पावसाची नोंद झाली. मागील २४ तासांत ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर २२ मिमी, शहापूर 6 मिमी, ठाणे ६८, मुरबाड ८ मिमी, भिवंडी २३ मिमी, कल्याण ४८ मिमी पावसाची नोंद झाली.

जूनच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. मुंबई, पालघर या भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. तर, उर्वरित राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊसधारा कोसळल्या.

हवामान खात्याने ३० जून रोजी राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’चा (सतर्क असावे) इशारा दिला आहे. तर, ठाणे, मुंबई, रायगडसह विदर्भात ‘यलो अलर्ट’चा (लक्ष असावे) इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा