Advertisement

देशातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये 'मुंबई' पहिल्या क्रमांकावर

मुंबई (Mumbai) हे जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

देशातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये 'मुंबई' पहिल्या क्रमांकावर
SHARES

मुंबई (Mumbai) हे जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर (Mumbai India’s most congested city) बनलं आहे. ५८ देशांतील ४०४ शहरांच्या अभ्यासावर आधारित ताज्या टॉमटॉम ट्रॅफिक (TomTom Traffic Index) इंडेक्सनुसार हे समोर आलं आहे. २०२१ मध्ये मुंबई हे भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर आणि जगातील पाचवे शहर बनलं आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार, मुंबईत किमान ५३ टक्के ट्रॅफिक जाम आढळून आलं आहे. म्हणजेच १५ मिनिटांचा मार्ग कव्हर करण्यासाठी मुंबईत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईतील कोंडी अधिकच वाढली आहे. याचाच परिणाम म्हणजे वाहतूक कोंडीची समस्याही अधिक निर्माण झाली आहे.

या इंडेक्समध्ये बंगळुरू १०व्या तर दिल्ली ११व्या स्थानावर आहे. इंडेक्सनुसार, बंगळुरू आणि नवी दिल्लीमध्ये ४८ टक्के ट्रॅफिक जाम होतं. निर्देशांकामध्ये सहा खंडांमधील ५८ देशांमधील ४०४ शहरांमधील वाहतूक कोंडीचा समावेश आहे.

बंगळुरू अजूनही जगातील अधिक ट्रॅफिक जाम आणि गर्दी असलेल्या १० प्रमुख शहरांपैकी एक आहे. मात्र बंगळुरू चार स्थानांनी घसरून १०व्या स्थानावर आलं आहे. वाहनांनी खचाखच भरलेल्या बंगळुरू शहरात गेल्या वर्षभरात ट्रॅफिक जॅममध्ये सरासरी ३२ टक्के घट झाली आहे.

अहवालानुसार, कोरोना महामारीपूर्वीच्या तुलनेत सकाळी गर्दीच्या वेळी ४९ टक्के आणि संध्याकाळी ३७ टक्के कमी वाहतूक होते. गर्दीतील या घसरणीमुळे, बंगळुरू जगातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये १०व्या स्थानावर पोहोचले तर कोरोनापूर्वी, २०१९ मध्ये बंगळुरु सहाव्या स्थानावर होते.



हेही वाचा

निवडणुका लांबणीवर? मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा