हायमास्टच्या प्रकाशाने मुंबई उजळणार

 Pali Hill
हायमास्टच्या प्रकाशाने मुंबई उजळणार

मुंबई – मुंबईतील रस्त्यांवर हायमास्ट दिवे लावण्याचे मुंबई महानगरपालिकेने निश्चित केले आहे. त्यासाठी एक निश्चित धोरण तयार करण्यात आले असून, या धोरणास महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सोमवारी अंतिम रूप दिले. त्यामुळे आता लवकरच मुंबईतील रस्ते उजळणार आहेत.

सध्या मुंबंईत 216 हायमास्ट दिवे असून, त्यापैकी 46 शहरात, पूर्व उपनगरात 74 तर पश्चिम उपनगरात 96 हायमास्ट दिवे आहेत. नव्या धोरणामुळे या दिव्यांची देखभाल आणि व्यवस्थापनही सोपे होणार आहे.

हायमास्ट दिवे बसवायच्या जागेतील सामान्य दिव्यांच्या प्रकाशाचे प्रमाण आणि जागेचे आकारमान विचारात घेऊन हे दिवे बसवण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच रस्त्यावर हायमास्ट दिवे लावण्याबाबत प्रकाशाची तीव्रता ही भारतीय मानक ब्युरोच्या प्रमाणकाद्वारे तपासून त्यानुसारच दिवे बसवण्यात येणार आहेत.

Loading Comments