Advertisement

एल्फिन्स्टन पूल 10 सप्टेंबरपासून बंद

पण परिसरातील रहिवासी पुनर्वसन योजनेची वाट पाहत आहेत.

एल्फिन्स्टन पूल 10 सप्टेंबरपासून बंद
SHARES

प्रभादेवीमधील बहुचर्चित एल्फिस्टन पूल पाडण्याला अखेर मूहूर्त मिळाला आहे. हा ब्रिटिशकालीन पूल 10 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. वाहतूक विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. म्हणजेच गणेशोत्वसानंतर पूलाचं पाडकाम सुरु होणार आहे.

स्थानिक आणि दुकानदारांच्या विरोधामुळे वारंवार ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या पुलासोबत परिसरातील काही इमारतीही पाडल्या जात आहेत. या इमारतीमधील रहिवाशांनी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याची आणि त्यानंतर पाडकाम करण्याची मागणी केली होती.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, हाजी नुरानी बिल्डिंग, ज्या बाधित इमारतींपैकी एक आहे, त्याचे सचिव मुनाफ ठाकूर यांनी मिड-डेला सांगितले की, "आमच्या पुनर्वसनाची माहिती मिळण्यापूर्वीच त्यांनी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन दिले होते आणि आश्वासन दिले होते की आम्हाला पर्यायी निवासस्थाने उपलब्ध करून देईपर्यंत काहीही केले जाणार नाही. आता आम्हाला कठोर उपाययोजना करण्यास भाग पाडले जात आहे. आम्ही स्वतःहून कुठे स्थलांतरित व्हायचे आहे? एमएमआरडीए आणि शहर विकास विभाग काय करत आहेत? मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर काही दिवसांत आम्हाला माहिती मिळवायची होती. आता महिने झाले आहेत. आणि अचानक, त्यांनी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पूल बंद होण्यापूर्वी आम्हाला जवळच्या ठिकाणी पर्यायी निवासस्थानांची योजना मिळाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करू."

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानंतर 10 सप्टेंबरपासून एल्फिन्स्टन पूल बंद केला जाणार आहे. हा पूल पाडून तिथे डबलडेकर पूल उभा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर तीन दिवसांनी पूल बंद केला जाणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव पूल लवकरात लवकर पाडण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवात पूल पाडला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने 10 सप्टेंबर तारीख निवडल्याचं वाहतूक विभागाने सांगितलं आहे.



हेही वाचा

गणपती विसर्जनासाठी फिरते तलाव सोसायट्यांच्या दारी

कबुतरांवरील अभ्यासाठी महाराष्ट्र सरकारची 12 सदस्यांची समिती स्थापन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा