Advertisement

हँगिंग गार्डनमधलं मुंबईचं प्रसिद्ध बूट हाऊस पुन्हा लोकांसाठी बंद

गेल्या पंधरा दिवसांपासून नोटीस लावण्यात आली आहे.

हँगिंग गार्डनमधलं मुंबईचं प्रसिद्ध बूट हाऊस पुन्हा लोकांसाठी बंद
SHARES

कमला नेहरू उद्यानाच्या परिसरात असलेला म्हातारीचा बूट पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथं येतात. मुंबईतील लहान मुलांसाठी असलेल्या सर्वात जुन्या उद्यानापैकी हे एक उद्यान आहे. पण, या उद्यानातील म्हातारीचा बूट हा धोकादायक असल्याचं पालिकेनं जाहीर केलं आहे.

मलबार हिल परिसरात असलेल्या या उद्यानातील म्हातारीच्या बुटावर धोकादायक असल्याची नोटीस चिकटवण्यात आली आहे. या वास्तूचा धोकादायक गटात समावेश करण्यात आल्यानं ती पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून नोटीस लावण्यात आली आहे. इमारतीचा काही भाग जीर्ण झाला आहे. त्याचबरोबर आतमध्ये असलेला लोखंडी जिना सुद्धा मोडकळीस आला आहे. हे सर्व दुरुस्तीचं काम करण्यासाठी ही वास्तू बंद ठेवण्यात आली आहे. इथं अनेक शाळकरी मुलांच्या सहली येत असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून आधीच नोटीस लावून सदर वस्तू बंद करण्यात आली आहे.

लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर रंगरंगोटी करून पर्यटकांसाठी पुन्हा नव्या रुपात बुट पाहायला मिळेल. असं पालिकेचे उद्यान प्रभारी बोराळकर यांनी सांगितलं.

बा बा ब्लॅक शीप, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, मछली जल की रानी है आणि ये रे ये रे पावसा यांसारख्या प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेतील नर्सरी राइम्सच्या थीमसह उद्यानाची पुनर्रचना करण्यात आली.

तथापि, नूतनीकरणाच्या काही वर्षांत कमला नेहरू उद्यानाला पुन्हा एकदा चकाकीची गरज भासू लागली आहे. कारण अनेक झूले, स्लाईड्स आणि प्ले स्ट्रक्चर्स निखळलेल्या अवस्थेत आहेत आणि भिंतीवरील रंग देखील फिका पडला आहे.हेही वाचा

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद, ‘या’दिवशी घेता येणार दर्शन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा