Advertisement

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद, ‘या’दिवशी घेता येणार दर्शन

श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणारंय.

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद, ‘या’दिवशी घेता येणार दर्शन
SHARES

मुंबईकरांचं (Mumbai) श्रद्धा स्थान आणि आराध्य दैवत असलेलं प्रभादेवीचं (Prabhadevi) सिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple)मंदिरात नेहमीच भक्त दर्शनासाठी येत असतात. फक्त मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरील देखील भक्त दर्शनासाठी येत असतात. अशाच गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 


सिद्धिविनायक मंदिर आजपासून बंद असणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणारंय. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.

18 डिसेंबरपर्यंत मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे. याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. 19 तारखेला गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, असं सांगण्यात आलं आहे.




हेही वाचा

कल्याण आणि डोंबिवलीकरांनो लक्ष द्या, १५ ते २२ डिसेंबर दरम्यान वाहतुकीत बदल

बायको सोडून गेल्याने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून अटक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा