Advertisement

कल्याण आणि डोंबिवलीकरांनो लक्ष द्या, १५ ते २२ डिसेंबर दरम्यान वाहतुकीत बदल

ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली.

कल्याण आणि डोंबिवलीकरांनो लक्ष द्या, १५ ते २२ डिसेंबर दरम्यान वाहतुकीत बदल
SHARES

वाहतूक विभागाच्या कोळसेवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई (Mumbai) अंतर्गत कल्याण-शीळ रोडवरील लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पूल निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम करण्यासाठी कल्याण फाटा कडून कल्याणकडे जाणाऱ्या वाहिनीवर मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करावयाचे आहे.

त्यासाठी 15 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत सदर पुलावरील वाहिनी वाहतूकीकरीता बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.दरम्यान मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे

प्रवेश बंद - कल्याण फाटाकडून कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - कल्याण कडून कल्याण फाटा कड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड - अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही बदलापूर चौक- खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.

दरम्यान मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.डोंबिवली पूर्व साईबाबा सागाव चौक ते मानपाडा चौक दरम्यान रस्त्याचे खोदकाम करून कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सदर भागात वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता वाहतूकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.



हेही वाचा

पालघर आणि डहाणूतील शेतकरी, व्यापारांसाठी विशेष पार्सल ट्रेनचे नियोजन

Mumbai Local News: Yatri App 'या' महिन्याच्या अखेरीस पश्चिम रेल्वेसाठी लाँच होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा