Advertisement

पालघर आणि डहाणूतील शेतकरी, व्यापारांसाठी विशेष पार्सल ट्रेनचे नियोजन

पार्सल ट्रेन उत्तर भारतातील दिल्ली आणि आसपासच्या भागात उत्पादने घेऊन जाण्यास मदत करेल.

पालघर आणि डहाणूतील शेतकरी, व्यापारांसाठी विशेष पार्सल ट्रेनचे नियोजन
SHARES

पश्चिम रेल्वे (WR) पालघर ते दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी विशेष पार्सल ट्रेनची योजना करत आहे.

डहाणू आणि पालघर भागातील शेतकरी आणि व्यापारी नियमितपणे भाजे, मासे आणि बरेच सामान विक्रिसाठी उत्तर भारतात पाठवतात. पण या पार्सल ट्रेन पालघर आणि डहाणू स्टेशनवर थांबत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मुंबई सेंट्रल इथून सुटणाऱ्या ट्रेनमधून हे सामान पाठवावे लागते.

डब्ल्यूआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "या सर्व प्रक्रियेत उत्पादन ताजी राहतील याची खात्री नसते. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिवसा लवकर लोकल ट्रेनने प्रवास करण्याची गरज नाही. आम्हाला या मार्गावर पार्सल ट्रेनचा समावेश असलेल्या तांत्रिक गोष्टींवर काम करावे लागेल. ही ट्रेन मुख्यतः पहाटे सुटेल. जेणेकरून ताजी उत्पादनं वेळेत योग्य स्थळी पोहोचतील आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही.

सुरुवातीला लांब पल्ल्याच्या गाड्यांना डहाणू आणि पालघर स्थानकावर थांबे देण्याबाबत चर्चा झाली. ही पार्सल ट्रेन दिल्ली आणि आसपासच्या भागात उत्पादने घेऊन जाण्यास मदत करेल.

“सध्या आम्ही डहाणू आणि पालघर ते चर्चगेट किंवा मुंबई सेंट्रलपर्यंत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतो आणि दिवसाच्या पहाटे सुटणाऱ्या गाड्यांमध्ये उत्पादन लोड करतो. तथापि, यापैकी काही गाड्यांना दिल्लीला पोहोचण्यासाठी 20 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, ज्यामुळे आम्हाला ताजी उत्पादने दिल्लीतील व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचते याची खात्री करणे कठीण होते,” पालघरचे स्थानिक शेतकरी आणि व्यापारी राजेश म्हात्रे म्हणाले.

गेल्या आठवड्यात, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात शेतकरी पहाटे लोकल गाड्यांवर पानांचे ढीग टाकताना दिसत होते. स्टेशनवर थांबल्यानंतर 20 सेकंदांच्या आत गाड्यांमध्ये भार टाकणाऱ्यांनी दाखवलेल्या कार्यक्षमतेबद्दल व्हिडिओचे कौतुक करण्यात आले.



हेही वाचा

Mumbai Local News: Yatri App 'या' महिन्याच्या अखेरीस पश्चिम रेल्वेसाठी लाँच होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा