परदेशात उपचार होत नाहीत? नानावटीत या...

 vile parle
परदेशात उपचार होत नाहीत? नानावटीत या...

फ्रान्सला व्यवसायानिमित्त गेलेल्या एका 70 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला अचानक ताप आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. फ्रान्सच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आणि पुन्हा भारतात परतण्याचा सल्ला दिला. चार दिवसांनंतर हे व्यावसायिक कामानिमित्त श्रीलंकेला गेल्यावर तिथे त्यांचा आजार आणखी बळावला. परदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे  उपचार करूनही त्यांच्या आजाराचे निदान होत नव्हते.

श्रीलंकेत असतानाही त्यांना खूप ताप आला, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांनी तिथल्या डॉक्टरांना दाखवले. तपासणीत त्यांचे 2 डी इको आणि ईसीजी रिपोर्ट अनियमित आले होते. त्यांच्या फुफ्फुसाला जंतूसंसर्ग होऊन त्यांना न्युमोनिया झाला. ते 3 ते 4 दिवस रुग्णालयात दाखल होते. तरीही त्यांचा त्रास कमी होत नसल्याने अखेर त्यांना हवाई रुग्णवाहिकेद्वारे भारतात आणण्यात आले. भारतात आल्यानंतर त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्ट्स आल्यानंतर त्यांना ‘लाईम डिसीज’ हा आजार झाल्याचं समजलं. ‘लाईम डिसीज’ हा आजार ‘बोरेलिया बर्गडॉर्फी’ या बॅक्टेरियाची लागण झालेल्या किटकांच्या डंखामुळे होतो.


त्यांचा ईसीजी अनियमित होता. जेव्हा त्यांना होणाऱ्या त्रासाचा आणि लक्षणांचा आम्ही अभ्यास केला, तेव्हा त्यांना लाईम डिसीज हा आजार झाल्याचे लक्षात आले. हा आजार बोरेलिया बर्गडॉर्फी’ या बॅक्टेरियाची लागण झालेल्या किटकांच्या डंखामुळे होऊ शकतो. पॉझिटिव्ह रक्त तपासणीतून याची खात्री झाली. त्यांना डॉक्सोसायक्लिक गोळ्या आणि वेदनाशामक गोळ्या देण्यात आल्या. तीनच दिवसात त्यांचा ताप गेला आणि सांधेदुखी, श्वसनाचा त्रासही संपला. त्यांच्यावर औषधांचे कुठलेही साईड-इफेक्ट्स दिसून आले नाहीत. 

- डॉ. हर्षद लिमये, एमडी, इंटर्नल मेडिसीन नानावटी रुग्णालय


काय आहे लाईम डिसीज?

लाईम डिसीज हा संसर्गजन्य रोग असून या आजारात ताप, डोकेदुखी आणि थंडी भरणे ही लक्षणे दिसून येतात. यापुढील पातळ्यांवर हा आजार गेल्यास, सांधेदुखी, हृदयविकार आणि न्युरोलॉजीकल आजार होऊ शकतात. ‘बोरेलिया बर्गडॉर्फी’ या बॅक्टेरियाची लागण झालेल्या किटकांच्या डंखामुळे हा आजार पसरतो. योग्य वेळी निदान न झाल्यास, लाईम डिसीज हा हृदय, मेंदू आणि सांधे यांच्यावर परिणाम होतो आणि कालांतराने रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

हे देखील वाचा -

'थॅलेसिमिया' एक गंभीर आजार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments