Advertisement

तर मग शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत?


तर मग शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत?
SHARES

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसून आपल्या नावाच्या चर्चा नको, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सुरू आहे. दरम्यान राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यावर भर देण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शरद पवार यांनी 2014 मध्येच आपण यापुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यांच्या निवडणूक लढवण्याबद्दलच्या बातम्या कोणी पसरवल्या हे आम्हाला माहीत नाही. मात्र शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितल्याचं, यावेळी आव्हाड म्हणाले. त्यामुळे शरद पवारांच्या लोकसभा लढवण्याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा