Advertisement

मुंबईत गुरुवारी १ हजार ३८४ नव्या कोरोना बाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आता हळुहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईत गुरुवारी १ हजार ३८४ नव्या कोरोना बाधितांची नोंद
SHARES

मुंबईत कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आता हळुहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यानुसार, नव्यान आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळं मुंबईकरांसह प्रशासनास ही दिलासादायक बाब आहे. मागील २४ तासांत मुंबई १ हजार ३८४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत बुधवारच्या तुलनेत रुग्णसंख्या काही प्रमाणात आणखी कमी झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीला १८ हजार ४० सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.

महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी १ हजार ३८४ नवे रुग्ण आढळले असून १२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ५८१ झाली आहे. तर मागील २४ तासांत तब्बल ५ हजार ६८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका आहे.

सध्या मुंबईतील २८ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच गुरूवारी नव्यानं सापडलेल्या १ हजार ३८४ रुग्णांपैकी १८४ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं महापालिकेकडील ३७ हजार ८२७ बेड्सपैकी केवळ २ हजार ९२७ बेड वापरात आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा