Advertisement

न्यू ईरा मिलच्या थकीत मालमत्ता कराची रक्कम वसूल


न्यू ईरा मिलच्या थकीत मालमत्ता कराची रक्कम वसूल
SHARES

मुंबई - माटुंगा पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर असलेल्या न्यू ईरा मिलची तब्बल 9 कोटींहून अधिक थकीत रकमेतील अखेर सव्वा दोन कोटी रुपये कराची रक्कम व्यवस्थापनाने महापालिकेला अदा केली. मागील अनेक वर्षांपासून या मिलच्या व्यवस्थापनाने कराची रक्कम आणि पाण्याची देयके भरली नव्हती.

माटुंगा पश्चिम सेनापती बापट मार्गावरील न्यू ईरा मिलच्या जागेचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर सुरू आहे. याठिकाणी बिग बाझार आणि चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या भागीदारीतील दोन कंपन्यांसह तब्बल 11 गाळयांमध्ये कार्यालये आणि शॉपी दुकाने उघडण्यात आली आहेत. परंतु कोट्यवधी रुपयांची थकीत बिलं असताना महापालिकेने त्यांना बिनदिक्कत गुमास्ता परवाना दिला आहे.

ही बाब स्थानिक मनसे नगरसेवक मनीष चव्हाण यांनी महापालिका जी उत्तर प्रभाग समिती, विधी समिती अध्यक्ष तसेच करनिर्धारण व संकलन अधिकारी यांच्याकडे ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी पाठपुरावा केला होता. ही रक्कम वसूल होत नसेल तर दुकाने व आस्थापना विभागाच्या वतीने त्यानुसार अखेर न्यू इरा मिलच्या व्यवस्थापनाने सव्वा दोन कोटी रुपये मंहापलिकेकडे भरले असल्याचे जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी मुबई लाईव्हशी बोलतांना सांगितले.

करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी संजोग कबरे यांनीही याला दुजोरा दिला असून थकीत कराच्या रकमेतील सव्वा दोन कोटी रुपये भरले आहे. उर्वरीत पाण्याची देयके याबाबत व्यवस्थापनाने हरकत घेतली आहे. त्यामुळे यासाठी जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि थकीत पाण्याच्या बिलाची रक्कम निश्चित केल्यानंतर ते पैसे महापालिकेला भरण्यास तयारी दर्शवली जाईल, असे कबरे यांनी स्पष्ट केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा