Advertisement

मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या अनेक विभागात वीजपुरवठा खंडित


मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या अनेक विभागात वीजपुरवठा खंडित
SHARES

मुंबईच्या अनेक विभागात सोमवारी सकाळी वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

सोमवारी सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली परिसरात वीज पुरवठा बंद झाला आहे. घाटकोपर परिसरातही वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

मुंबईत एकाच वेळी वीज पुरवठा ठप्प झाल्याच्या घटनेमुळे गोंधळ उडाला आहे. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल ठप्प झाल्या आहे. सर्व स्थानकांवर लोकल थांबलेल्या आहे.

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्यालाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा