Advertisement

प्रतिबंध असताना गर्भलिंग निदान तपासणी सुरू


प्रतिबंध असताना गर्भलिंग निदान तपासणी सुरू
SHARES

कायद्याच्या तरतुदीनुसार गर्भलिंग निदान तपासणी करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे राज्यातील गर्भलिंग निदान तपासणी केंद्र बंद आहेत. तरीही राज्यातील विवाहित दांपत्य गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगणा आदी राज्यात जाऊन सासरचे किंवा माहेरचे पत्ते देऊन गर्भलिंग निदान करतात. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाकडून काय प्रयत्न केले जात आहे? तसेच गर्भलिंग निदान चाचणीसाठी आधार कार्ड जोडण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे का? असा प्रश्न आमदार नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.



आरोग्य मंत्र्यांची कबुली

यास उत्तर देतांना आरोग्यमंत्री यांनी शासन अद्याप तरी याबाबत विचाराधीन नसल्याचं सांगितलं. सोबतच राज्यात ८ हजार ३६ सोनोग्राफी केंद्र कार्यान्वित आहे. या केंद्रात कायद्याच्या तरतुदीनुसार गर्भलिंग निदान तपासणी करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. मात्र राज्यातील काही विवाहित दांपत्य सीमेलगतच्या इतर राज्यांमध्ये जाऊन सोनोग्राफी करत असल्याचं निदर्शनात आल्याची कबुली आरोग्यमंत्री यांनी दिली.


राज्यभरातून तक्रारी प्राप्त 

राज्यात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असते, सिमेलगतच्या भागात परराज्यात जाऊन असे परिक्षण करून घेण्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

आतापर्यंत २० जिल्ह्यांत ५३८ तक्रारी आल्या आहेत. २९ सोनोग्राफी सेंटर्स सील केले गेले असून ९ केंद्रांवर डीकॉय केले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांवर सातत्याने तपासणी करण्यात येते आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येते असं सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा