Advertisement

मुंबईतील 'या' भागात चक्क no kissing zone!

सध्या अनेक प्रियकर व प्रियसी हे मुंबईतील अनेक परिसरातील आढोष्याला उभं राहून अश्लिल चाळे करत असताना सहजच पाहायला मिळतं.

मुंबईतील 'या' भागात चक्क no kissing zone!
SHARES

सध्या अनेक प्रियकर व प्रियसी हे मुंबईतील अनेक परिसरातील आढोष्याला उभं राहून अश्लिल चाळे करत असताना सहजच पाहायला मिळतं. परंतू त्यांच्या अशा वागण्याचा रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. त्यामुळं यावर उपाय म्हणून आता 'नो किसींग झोन' सुरू करण्यात आला आहे. हा किसींग झोन परदेशात नसून आपल्या मुंबईत आहे. बोरिवली पश्चिम येथील असलेल्या जॉगर्स पार्कजवळ अनेक तरुण जोडपी भर रस्त्यात अश्लील कृत्य करत असतात. यामुळे या विभागात राहणारे नागरिक त्रस्त झाले असून अश्या जोडप्यांवर बंधन घालण्यासाठी त्या नागरिकांनी रस्त्यावरच NO KISSING ZONE असं लिहिलं आहे.

बोरिवलीच्या चिकुवाडीतील सत्यम शिवम सुंदरम सोसायटी जवळ हे जॉगर्स पार्क आहे. या ठिकाणी नागरिक व्यायाम करायला, फिरायला येतात. मात्र, कोरोना काळातल्या निर्बंधांमुळं काही जोडपी या पार्कजवळच दुचाकीवर किंवा चारचाकीमध्ये बसून अश्लिल चाळे करत असतात. ह्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती असून, त्याच्या मध्यभागी एक गार्डन तयार करण्यात आलं आहे. 

या ठिकाणी जोडपी अश्लील कृत्य करताना नेहमीच दिसत असतात. या जोडप्यांना इथले रहिवासी कंटाळले असून त्यांना प्रतिबंध करण्यासाठी रहिवाशांनी सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यावर NO KISSING ZONE असं लिहिलं आहे.



हेही वाचा -

मराठी अभिनेत्रीकडून कॉम्प्रमाइजची मागणी करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेनं चोपलं

शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक, डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा